पतंजली ट्रस्टच्या नावे 54 हजारात फसवणूक

जळगाव : पतंजली योग ट्रस्टमधे उपचार करुन देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करत व्यावसायीकाची 54 हजार 600 रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज काळे हे तरुण व्यावसायीक असून जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात राहतात. त्यांच्या मोबाईलवर 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी इसमाने मेसेज पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यानंतर पलीकडून मेसेज पाठवणा-या इसमाने पंकज काळे यांना पंतजली योगपीठ ट्रस्टमधे उपचार करुन देण्याचे आमिष दाखवले. पलीकडून मेसेज पाठवणा-या इसमाने दिलेल्या बॅंक खाते क्रमांकावर इकडून पंकज काळे यांनी 54 हजार 600 रुपयांची धनराशी वर्ग केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत संबंधीत मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हे.कॉ. जितेंद्र राजपूत करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here