नोबल इंटरनॅशनल स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव : पाळधी तालुका धरणगाव येथील नोबल इंटरनॅशनल  स्कूलतर्फे स्नेहसंमेलन साईबाबा मंदिर पटांगणात काही दिवसांपुर्वी उत्साहात संपन्न झाले. यावेळी माहेरची साडी फेम प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत गाजलेल्या मराठी चित्रपट गीतावर नृत्य करून उपस्थिताची मने जिंकली.

कार्यक्रमास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि प सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, बुद्रुकचे सरपंच प्रकाश पाटील, उद्योजक दिलीप पाटील, गोपाल कासट, अनिल कासट, डॉ. निलेश चांडक, डॉ. हर्षल माने, महानंदा पाटील, प्रतीक्षा पाटील, पल्लवी पाटील, शिक्षणाधिकारी विकास पाटील, समाधान पाटील, दिगंबर महाले व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीतावर नृत्य करून प्रेक्षकांची दाद मिळवली स्कूलच्या संचालिका अर्चना सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे ध्येय असल्याचे यावेळी कथन केले. ग्रामीण भागातील मुला मुलींना नोबेल स्कूलच्या माध्यमातून शिक्षण देऊन सुजाण नागरिक घडवण्याचे ध्येय असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक प्रशांत सूर्यवंशी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here