2,01,20,934.04 रुपयात बॅंक ऑफ इंडीयाची फसवणूक – भुसावळला गुन्हा दाखल

जळगाव : बॅंक खातेदार मयत झाले असतांना देखील बॅंक खाते सुरु असल्याचे भासवून पती पत्नीने संगनमताने 2,01,20,934.04 रुपयात भुसावळ येथील बॅंक ऑफ इंडीयाची फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश प्रकाश भिलाणे आणि सौ.तेजश्री प्रकाश भिलाणे (दोन्ही रा. देवराम नगर जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. योगेश रामदास पाटील रा. भुसावळ यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गैरव्यवहार भुसावळ येथील विठ्ठल मंदीर वार्ड येथील बॅंक ऑफ़ इंडीया शाखेत 11 जानेवारी 2022 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीत झाला असल्याचे उघडकीस आले आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी गु.र.न. 68/23 भा.द.वि. 409, 420, 421, 424, 463, 464, 465, 467, 468, 469, 470, 471, 477 अ‍, 201, 34 या कलमाखाली नोंद करण्यात आला आहे. संगनमताने बनावट दस्तावेज तयार करुन मयत इसमाच्या नावे असलेल्या बॅंक खात्याचा गैरवापर करुन बॅक शाखेतील वेगवेगळ्या बॅंक खात्यातील जमा रकमा, एफडी व बॅंक खात्यातील जुन्या रकमा शाखा व्यवस्थापक यांच्या परवानगीविना संशयीत दाम्पत्याने व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्य्वहारासाठी बॅंकेतील विड्रॉल स्लिपा, इतर दस्तावेज व बनावट तयार केलेल्या बॅंक खाते उघडण्याचा फॉर्म, केवायसीचे कागदपत्र गहाळ करुन गुन्ह्यातील पुरावा नष्ट केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उप विभागीय अधिकारी डेरे करत आहेत. दोघा संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.     

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here