आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

जळगाव : दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ महत्वाचा दिवस म्हणजे श्रद्धेय पदमश्री डॉ भवरलालजी जैन ( अर्थातच आपल्या सर्वांचे मोठे भाऊ ) यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते & पत्रकार मदन रामनाथ लाठी यांनी आपले ८३ वे रक्तदान येथील  इंडियन रेड क्रॉस सोसायटी  येथे केले. मदन लाठी यांचा आयुष्याचा रक्तदानाचा प्रवास चोपडा येथे कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यलयात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्प मध्ये सत्रसेन येथे सुरवात झाली . त्यानंतर जसा जसा त्यांचा आयुष्याचा प्रवास होत गेला तिथे तिथे ते रक्तदान करीत गेले त्यात  जास्त  जळगाव येथे, नागपूर, शिर्डी, मागील ४ वर्षांपासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत पिंपरी चिंचवड येथील वाय सि एम येथे & नांतर  १४ नोव्हेंबर & आज दिनांक २५ फेब्रुवारी असे करत गेले . त्यांनी आज पर्यंत ८१ वेळेस साधे रक्तदान & २ वेळेस प्लास्मा ( देऊन ४ रुग्णांना पुणेत  जीवनदान मिळाले आहे )

त्यांचा या कार्य बद्दल त्यांचे  गुरु आदरणीय भाऊ , मोठे बंधू यांनी वेळो वेळी कौतुक केले आहे. २०२२ मध्ये त्यांना महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटनने कोरोना योद्धा सन्मान पात्र दिले असून त्या काळात पुणे & जळगाव येथे त्यांचा विविध संघटने तर्फे सत्कार करण्यात आला आहे. २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डा हर्षवर्धन यांनी मदन लाठी चे या करीत असलेल्या कार्य बद्दल कौतुक केले आहे & त्याबरोबर विविध शासकीय अधिकारींनी सुद्धा कौतुक  केले आहे. 

“रक्तदान म्हणजे सर्वश्रेठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वछंदी रक्तदानकरून आणि कुणास जीवनदान देवून लाडके देवाचे व्हावे .” हे ब्रीदवाक्य लाठीनी ठरविले आहे.  ऑक्टोबर २०२१ मध्ये  आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सिरांचा ७६ वा वाढदिवस & त्याच वेळी मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान म्हणजे तो एक योगायोगच म्हणावा लागेल . त्यानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केले होते . त्यानंतर विविध दिवस & एक रक्तदानानंतर ३ महिन्याचा विश्रांती देऊन पुन्हा तीन महिन्याने रेगुलर करीत राहिले त्यात  २ जानेवारी  २०२२ महाराष्ट्र पोलीस स्थापणा दिवस, १ मे महाराष्ट्र कामगार दिवस, १५ऑगस्ट २०२२  आपल्या देशाचा ७५ व आझादीका महोत्सव, १४ नोव्हेंबर २०२२ & आज २५ फेब्रुवारी  २०२३ असे रक्तदान करीत आहे. लाठीचा वयाचा ६५ वर्षांपर्यंत  डॉक्टरांच्या सल्यानुसार ते रक्तदान करीत राहणार आहेत & इतरांना प्रोत्साहित करीत आहे त्यांच्या आजच्या उपक्रमाबद्दल जैन उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय श्री अशोक भाऊ यांनी त्यांचे अभिनंदनद्या उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे . मदन लाठी या बरोबर विविध सामाजिक कार्य & पत्रकारिता करीत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here