विवाहितेचा फोटो प्रसारीत करुन पतीला शिवीगाळ व धमकी

जळगाव : विवाहीतेचा फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करुन तिच्या पतीला शिवीगाळ व धमकी देणा-याविरुद्ध अब्रु नुकसानीसह सायबर अ‍ॅक्टनुसार सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या इसमाच्या पत्नीचा फोटो अनोळखी इसमाने स्वत:ची ओळख लपवून इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत केला. वेगवेगळ्या बनावट इस्टाग्राम खात्यावरुन विवाहितेच्या पतीसह तिच्या भावाला शिवीगाळ व धमकी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here