जैन इरिगेशनचे संस्थापक सदस्यगिरीधारीलाल ओसवाल पंचतत्त्वात विलीन

जळगाव, दि. 9 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या संस्थापक सदस्यांपैकी एक वरिष्ठ सदस्य  गिरधारीलाल रावतमलजी ओसवाल (वय ८६ वर्षे ) ह्यांचे वृद्धापकालीन अल्पआजाराने गुरुवार दि. ०९ मार्च २०२३ रोजी पहाटे ०३.३० वाजता नाशिक येथे देहावसान झाले. ते जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे आतेभाऊ होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आनंद ओसवाल, स्नुषा,  दोन मुली शोभा व शीतल, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

श्री ओसवाल हे पेशाने  मेकॅनिकल इंजिनियर होते व ते शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. त्यावेळी असलेल्या सेवेचा राजीनामा देऊन ते जैन इरिगेशनमध्ये पूर्णवेळ कार्यरत झाले. विविध विभागात काम करून त्यांनी लेखा विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या पार्थिवावर जैन हिल्सच्या प्रांगणातील मोक्षधाम येथे सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आनंद यांनी अग्निडाग दिला. यावेळी जैन आणि ओसवाल परिवारातील सदस्य, आप्तेष्ठ, कंपनीचे सहकारी जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते. 

तीन महिन्यांपूर्वीच 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रभावतीबाई ओसवाल यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी  जैन इरिगेशन सोबत जैन चॅरिटीजचे  विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here