बलात्कारासह तरुणीचा गर्भपात – तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : तरुणीवर बलात्कारासह ठरवलेल्या तारखेला लग्नाला उपस्थित राहिले नाही म्हणून तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत तरुणीने पोलिस स्टेशनला धाव घेत आपली कैफीयत मांडली.

पिंप्राळा हुडको या जळगावच्या उपनगरातील रहिवासी असलेल्या व शिक्षण घेत असलेल्या पिडीत तरुणीची सन 2021 पासून एरंडोल येथील हसन असलम मोमीन या तरुणासोबत ओळख होती. या कालावधीत हसन याने पिडीत तरुणीसोबत वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापीत केले. त्यातून ती गर्भवती झाली. हसन आणि त्याचे आईवडील या तिघांनी मिळून पिडीतेला वेळोवेळी कॉफीचे सेवन करण्यास भाग पाडून पपई खाण्यास दिली. पपई खाल्याने गर्भपात होण्यास मदत होते हे माहिती असून देखील तिघांनी मिळून पिडीतेचा गर्भपात घडवून आणल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे.

त्यानंतर लग्नाची तारिख निश्चीत करुन ठरलेल्या तारखेला कुणी हजर राहिले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे पिडीतेने म्हटले आहे. याप्रकरणी फसवणूकीसह बलात्काराच्या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here