आधी पाठवले 5 रुपये नंतर गायब झाले 83 हजार

जळगाव : डीटीडीसी कुरीयर कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून पाच वेळा परस्पर झालेल्या बँक व्यवहारातून एकूण 83 हजार रुपये गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन श्रावण पाटील हे धरणगावचे रहिवासी आणि व्यावसायिक आहेत. 16 मार्च रोजी ते त्यांच्या कार्यालयात हजर असतांना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाचा कॉल आला. पलीकडून बोलणा-याने त्यांना आपण डीटीडीसी कुरीयर कंपनीच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. पलीकडून बोलणा-याने त्यांना आलेल्या कुरीयरचा तपशील विचारला. भावे यांनी तो तपशील त्यांना कथन केला.

सर्व माहिती सविस्तर ऐकून घेतल्यानंतर पलीकडून बोलणा-याने भावे यांना base APK नावाची पिडीएफ फाईलची एक लिंक पाठवली. त्या लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर त्या लिंक वर जावून माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरल्यांनंतर पुढील सूचनेनुसार भावे यांनी ऑन लाईन पाच रुपये लिंक द्वारे पाठवले. दुस-या दिवशी विविध पाच ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून एकूण 85 हजार वळते झाल्याचे भावे यांना दिसून आले. चोपडा येथे कार्यरत एका पोलिस कर्मचा-याची देखील अशीच पाच रुपयाच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. नागरिकांनी अनोळखी लिंकवर माहिती पाठवून पुढील प्रक्रिया करु नये यासह विविध प्रकारची सतर्कता बाळगण्याचे आवाहन आणि माहिती प्रसार माध्यमातून वेळोवेळी केली जात असते. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here