आ. लता सोनवणेंकडून मनपा परत घेणार मानधन

जळगाव : जळगाव महानगर पालिकेच्या तत्कालीन नगरसेविका लता सोनवणे यांना मनपाने अदा केलेले मानधन परत घेतले जाणार आहे. मनापाकडून अदा करण्यात आलेले मानधन वसुलीसाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे.

मात्र ते पत्र त्यांनी स्वीकारले नसल्याचे समजते. चोपडा विधानसभेची निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर आ. लता सोनवणे यांनी मनपा नगरसेविका पदाचा राजीनामा दिला होता. तेरा महिन्यांच्या कालावधीत त्यांना दीड लाख रुपये मानधन अदा झालेले आहे. मानधन परत केले नाही तर कायदेशीर कारवाईची पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here