भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केले महिला प्रवाशांचे स्वागत

जळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना राज्य महामंडळाच्या बसमध्ये सर्व प्रकारच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. दि. 17 मार्च 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या बोदवड बसस्थानकात भाजपच्या वतीने महिला प्रवासी वर्गाचे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी महिला प्रवाशांमध्ये आनंद दिसून आला. राज्य सरकारने ही योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थित प्रवासी महिलांनी आभार मानले.

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, महिला मोर्चाच्या जळगाव जिल्हा समन्वयक गीता गिल्ड़ा, जिल्हा उपाध्यक्षा अनिता अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस संगीता पाटील, जिल्हा चिटणीस शीतल देशमुख, माजी जि प सदस्या प्रतिभा राणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा रेखा हिंगे, बोदवड तालुका उपाध्यक्षा ललिता चौधरी, कविता जैन, सुवर्णा जैन, रोहिणी पाटील, लता शिरपुरकर, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, सोशल मिड़िया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल, शहर सरचिटणीस वैभव माटे, संजय अग्रवाल, मधु पारधी, महेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here