जळगाव : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. 19 मार्च रोजी जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
माजी उपमहानगप्रमुख सोहम विसपुते, राहुल नेतलेकर, विलास भदाणे, फेरीवाला महानगरप्रमुख बाळू बाविस्कर, विभागप्रमुख नितीन तमायचे, बॉबी चांगरे, वकील आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख अँड. राजेश पावसे, रविंद्र सोनवणे, अजय धोबी, रुपेश चौधरी, रवी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता ताई माळी, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक शाम कोगटा, शोभा चौधरी, नगरसेवक चेतन सनकत, दिलीप पोकळे, देशमुख मामा, किशोर भोसले, आशुतोष पाटील, शिवराज पाटील, आदींची उपस्थिती होती