महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे – सागर चौबे यांचे हस्ते नाणेफेक

जळगाव : येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती अंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे. काल व आज जळगाव संघाच्या साखळी सामना केडन्स क्रिकेट क्लब पुणे यांच्या दरम्यान खेळण्यात आला सामन्याची नाणेफेक सागर चौबे यांचे शुभ हस्ते करण्यात आली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत केडन्स संघाने ९० षटकात ९ गडी बाद ४१० धावा केल्या त्यात दिग्विजय पाटील १५० व कर्णधार हर्षद खडीवाले १३८ आणि निपुन गायकवाड ५६ धावा केल्या गोलंदाजीत जळगाव संघातर्फे शुभम शर्मा ४ व ऋषभ कारवा आणि वरुण देशपांडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केल्या प्रतिउत्तर जळगांव संघाने ७९.२ षटकात सर्व गडी बाद २५९ धावा करू शकला त्यात शुभम शर्मा ६२ निरज जोशी ५० आणि सिद्धेश देशमुख ३३ धावा केल्या गोलंदाजीत कॅडन्स क्लब तर्फे शुभम खरात ५, कौशल तांबे ३ आणि अक्षय वाईकर २ गडी बाद केल्या आणि हा सामना कॅडन्स क्रिकेट क्लब संघाने पहिल्या डावाचा आधारावर हा सामना जिंकला ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व संदीप गांगुर्डे आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here