जेष्ठ नागरिकाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी वृद्ध भिमराव शंकर सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. मयताच्या जवळच्या नातेवाईक महिलेसह एका इसमास या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने ते आणि त्यांचे पथक कौतुकास पात्र ठरले आहे.  

मयत भिमराव शंकर सोनवणे हे त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होते. त्याला वेळोवेळी नकार मिळत होता.  नेहमीच्या या त्रासाला कंटाळून त्या महिलेसह रावेर तालुक्यातील उदळी येथील जावेदशाह ऊर्फ जय अलीशाह याच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. अटकेतील दोघा संशयीत आरोपींना यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुनिल मोरे करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, संदिप सावळे, पोना किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, रणजित जाधव, पोका ईश्वर पाटील, चापोना दर्शन ढाकणे, चापोकॉ प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here