मित्रानेच मित्राच्या लुटीची आखली योजना – तिघांना अटक

जळगाव : अ‍ॅक्टिव्हा गाडीवर सोबत बसलेल्या मित्रानेच मित्राची दोघा साथीदारांच्या मदतीने लुट केल्याची योजना उघड झाली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. मित्र म्हणवणा-या कथित मित्राची करतूत एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या  दोन तासात उघड करुन पोलखोल केली आहे. साहिल विजय कासार या सुत्रधार मित्रासह भोला अजय सरपटे आणि आतिष नरेश भाट अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 28 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक जगन्नाथ निंभोरे (रा. किसनराव नगर जळगाव) हा विद्यार्थी तरुण व त्याचा मित्र साहिल विजय कासार (रा. सिंधी कॉलनी नेत्र ज्योती हॉस्पीटल जवळ जळगाव) असे दोघे जण अ‍ॅक्टिव्हा गाडीने रायसोनी इंजीनिअरींग कॉलेज कडून जळगावच्या दिशेने येत होते. कृष्णा लॉन्स मेहरुण तलावाजवळ दोघा तरुणांनी अभिषेक यास अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि चांदीची चेन असा ऐवज जबरीने हिसकावून घेतला होता.

या घटने प्रकरणी अभिषेक निंभोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार 29 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती अभिषेक याच्यासोबत गाडीवर बसलेला साहिल कासार हाच या घटनेचा सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. अभीषेक जगन्नाथ निंभोरे याचा मित्र साहिल विजय कासार याने त्याच्या दोघा साथीदारांची नावे कबुल केली. त्यानुसार त्याच्यासह त्याचे साथीदार भोला अजय सरपटे (रा. नवल कॉलनी नेत्र ज्योती हॉस्पीटल जवळ जळगाव) आणि आतिष नरेश भाट (रा. सिंगापुर कंजरवाडा जळगाव) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षक जयपाल हिरे याच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना सुधीर साळवे, पोना ईम्रान सैय्यद, पोकॉ छगन तायडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here