जळगाव : राहुल नेतलेकर यांची जळगाव महानगर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या सहीने करण्यात आलेल्या या नियुक्तीचा कालावधी एक वर्ष आहे.
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या या नियुक्तीप्रसंगी सभागृह नेते ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, नगरसेवक गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते. राहुल नेतलेकर यांच्या नियुक्तीने समाजातील सर्व स्तरासह कंजरभाट समाजातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.