नियमबाह्य एसीच्या वापराबाबत काय कार्यवाही केली? वरिष्ठांनी जिल्हाधिका-यांना मागितला अहवाल

जळगाव : वेतनश्रेणीला अनुसरुन एसी वापरण्यास परवानगी नसतांना देखील जिल्हाधिकारी आणी त्यांच्या अधिपत्याखालील अनेक महसुल अधिकारी आपल्या दालनात वातानुकुलीत यंत्र (एअर कंडीशनर) वापरत असल्याचे उघड झाले आहे. अशा नियमबाह्य एसी वापराबाबतचा मुद्दा जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पुढे आणला आहे. याचाच परिपाक म्हणून उप आयुक्त (सामान्य प्रशासन) नाशिक विभाग यांनी जळगावसह नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आदी जिल्हाधिका-यांना अशा नियमाबाह्य एसी वापराबाबत कार्यवाही करुन तसा अहवाल पाठवण्याचे पत्र पाठवले आहेत. आता तरी जिल्हाधिकारी महोदय आपल्या दालनातील एसी काढतील काय? असा सवाल या निमीत्ताने जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. जिल्हाधिका-यांनी एसी काढून टाकल्यास इतर संबंधीत अधिकारी देखील आपल्या दालनातील  एसी काढतील असे म्हटले जात आहे.  

आतापर्यंत जळगाव जिल्हाधिका-यांनी आपल्या दालनातील एसी काढून टाकायला हवा होता अशी सर्वसामान्य जनतेची ओरड आहे. सर्वसामान्य जनतेच्या कररुपी महसुलातून या नियमबाह्य एसीचा वापर सुरु असल्याची या निमित्ताने ओरड सुरु आहे. या मुद्द्याला धरुन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी नाशिक विभागीय आयुक्त आणी राज्याच्या सचिव पातळीपर्यंत पत्र व्यवहार केला. याबाबतचा अहवाल उप आयुक्त (सामान्य प्रशासन) नाशिक विभाग यांना सत्वर सादर करण्याचे पत्र जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीकडे जनतेचे लक्ष लागून आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here