सहायक फौजदार अतुल वंजारी यांची आगग्रस्त दुकानदारास मदत

जळगाव : आगीत दुकान जळून खाक झाल्याने हवालदील झालेल्या आगग्रस्त दुकानदारास मदतीचा हात देत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी आपला वाढदिवस आगळया वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आज 19 एप्रिल 2023 रोजी सहायक फौजदार अतुल वंजारी यांचा वाढदिवस आहे. कोणताही बडेजाव न करता घरगुती पद्धतीने तसेच आगग्रस्त दिव्यांग दुकानदार बांधवास सिलबंद पाकीटात सढळ हस्ते यथोचीत मदत करुन सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी समाजाला मानवतेचा संदेश दिला आहे.

रविवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गणपती नगरातील किराणा दुकानदार राजेंद्र खिवंसरा यांच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आग आटोक्यात आली तरी किराणा दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपले दुकान जळाल्यामुळे दिव्यांग दुकानदार राजेंद्र खिवंसरा हवालदील झाले. गेल्या तिस वर्षापासून या दुकानाच्या माध्यमातून राजेंद्र खिवंसरा हे आपला आणी बहिणीसह भाचीचा उदरनिर्वाह चालवत होते. या मदत प्रसंगी अतुल वंजारी यांच्या समवेत रोशन पगारीया, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे साईनाथ मुंडे, पोलिस बॉईज अनिल सोनवणे आदी उपस्थित होते. स.फौ. अतुल वंजारी यांचे कौतुक होत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here