फोर व्हिलरची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष – साडेपाच लाखात फसवणूक

जळगाव : किया मोटर्सची बुरहानपुर येथे डीलरशिप मिळवून देतो असे सांगून आरटीजीएसद्वारे साडे पाच लाख रुपये स्विकारुन ऑनलाईन फसवणूक करणा-या दोघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी विजय एकनाथ पाटील यांचेशी अशोक पांडे व धरणीधर पाटील असे नाव सांगणा-या दोघांनी संपर्क साधला. याशिवाय विजय पाटील यांच्या मेल वर देखील मेसेज पाठवला. आपणास बुरहानपूर येथे किया मोटर्सची डीलरशिप मिळवून देतो असे सांगून पलीकडून मोबाईलवर बोलणा-या दोघांनी गोड बोलून विजय पाटील यांच्याकडून आरटीजीएस च्या माध्यमातून साडे पाच लाख रुपये ऑनलाईन स्विकारले. मात्र कोणतीही डीलरशिप दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रावेर तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी विजय पाटील यांनी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. अशोक उतेकर करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here