शरद पवारांचा सीबीआयवर निशाना

On: August 20, 2020 11:32 AM

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे आज पुण्यस्मरण आहे. या निमीत्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत त्यांना अभिवादन केले. डॉ. दाभोळकरांच्या मारेक-यांचा तपास अजून लागलेला नाही. याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी सीबीआय वर निशाना साधला. डॉ. दाभोळकर यांचा तपास सीबीआय सन 2014 पासून करत आहेत. मात्र अद्याप दाभोळकरांना न्याय मिळालेला नाही. ही बाब सुशांतसिंग राजपूत याच्या बाबतीत घडणार नाही असा विश्वास रा.कॉ. शरद पवार यांनी व्यक्त करत एकप्रकारे सीबीआय वर निशाना साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग राजपूत याच्या कथित आत्महत्ये प्रकरणी तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश नुकताच दिला आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीकामी सहकार्य करेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र याचवेळी डॉ. दाभोळकर यांना सीबीआय कडून अद्याप न्याय मिळाला नसल्याचे देखील म्हटले. याची पुनरावृत्ती सुशांतसिंग राजपूत याच्याबाबतीत सुरु असलेल्या तपासकामी होणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment