हॉटेलच्या बिलावरुन वाद – चाकू हल्ल्यात दोघे जखमी

जळगाव : हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाल्याची घटना अमळनेर येथे घडली. या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस रविंद्र पाटील रा. अमळनेर असे जखमीचे तरुणाचे नाव आहे. गौरव उर्फ दादू सुनिल पाटील (रा. गलवाडे रोड अमळनेर), दिपक कैलास बोरसे (रा. नाशिक) आणि भागवत बाळू पाटील (रा. लक्ष्मी नगर अमळनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यालगत असलेल्या हॉटेल कृष्णाई येथे ऋषीकेश उर्फ बाळा शाम सोनार, तेजस रविंद्र पाटील आणि सौरभ संदानशिव असे तिघे जण 28 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जेवण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी गौरव उर्फ दादू सुनिल पाटील, दिपक बोरसे आणि भागवत बाळू पाटील  आदींनी ऋषिकेश सोनार आणि तेजस पाटील यांना धमकावून चाकूचा धाक दाखवून ऋषिकेश याच्याकडील दारुची बाटली मागून जेवणाच्या बिलावरुन  वाद घालून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तेजस यास दिपक बोरसे व भागवत पाटील याने पकडून गौरव याने चाकूने पोटावर चाकू हल्ला केला. त्यात तेजस गंभीर जखमी झाला. ऋषिकेश तेजसला सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर देखील चाकू हल्ला करण्यात आला. दोघांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. राकेशसिंग परदेशी करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here