अल्पवयीन मुलीस पळवून लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस शिक्षा

जळगाव : अल्पवयीन मुलीस पालकांच्या रखवालीतून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने विविध कलमाखाली शिक्षा सुनावली आहे. दिपक रविन्द्र भिल (रा. अकुलखेडा ता.चोपडा जि. जळगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

5 फेब्रुवारी 2020 रोजी या घटनेप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला गु.र.न. 25/20 भा.द.वि. 363 नुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दिपक रविंद्र भिल हा पिडीत मुलीसोबत 17 फेब्रुवारी रोजी देवळाली ता. करमाळा ता. सोलापूर येथे पोलिसांना मिळून आला होता. त्यानंतर पिडीतेच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध  या गुन्हयात आरोपीविरुद्ध भा.द.वि. 376(1) (ए), 376 (3) सह बालकांचे लैंगिंक गुन्हयापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी दिपक भिल यास अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी पुर्ण केला. गुन्हयातील अटक आरोपीविरुध्द अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. तपासातील सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. आरोपी दिपक रविद्र भिल यास भा.द.वि. कलम 363 नुसार सात वर्ष, बालकांचे लैगिक अपराधापासून सरक्षण कायदा 2012 चे कलम 4 मध्ये विस वर्ष आणि कलम 8 मध्ये तिन वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांना या तपासकामी पोहेकॉ प्रदीप राजपुत, पोना जयदिप राजपुत, पोना मधुकर पवार आदींनी मदत केली. पो.कॉ. नितिन कापडणे यांनी केस वॉच म्हणून कामकाज पाहीले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here