अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-याविरुद्ध गुन्हा

जळगाव : उस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या इसमाविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडजिन्सी ता. रावेर येथील मुळ रहिवासी मात्र उसतोड कामानिमीत्त फलटण – बारामती येथील साखर कारखाना परिसरात राहणा-या इसमाविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उसतोडीच्या कामानिमीत्त पिडीत मुलीचे आईवडील आपल्या परिवारासह फलटण येथे गेले होते. त्यावेळी संशयीत आरोपी हा देखील त्याठिकाणी उस तोडीसाठी गेला होता. उसतोड मजूर दाम्पत्याची मुलगी झोपडीत  एकटी असल्याचे बघून त्याने तिच्यावर वेळोवेळी शरीरसंबंध केले. सुमारे सात ते आठ महिन्यापुर्वी झालेल्या या प्रकारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here