जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. संजना फरान शेख आणि तिचा पती फरान शब्बीर शेख दोघे राहणार तांबापुरा जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या पती पत्नी विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 9 मे 2023 रोजी तांबापुरा परिसरात संजना फरान शेख व तिचा पती फरान शब्बीर शेख या दोघांनी तबस्सुम नावाच्या महिलेला  मारहाण व डाव्या हाताच्या दंडाला चावून दुखापत केली होती. तसेच संजना हिने तिच्या पर्स मधील 2700 रुपये रोख व चांदीच्या अंगठीची जबरी चोरी केल्याप्रकरणी तबस्सुम या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांबापुरा परिसरातून दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून  संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here