फार्म हाऊसवर वेळोवेळी शरीरसंबंध – तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव : जळगाव येथील तरुणीने एरंडोल येथील तरुणाविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एरंडोल शहरानजीक महामार्गावरील एका फार्म हाऊसमधे आपल्यासोबत तरुणाने वेळोवेळी शरीर संबंध केल्याचा तरुणीचा तरुणाविरुद्ध आरोप आहे.

अंकुश मारुती महाजन (माळी) असे बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या एरंडोल येथील तरुणाचे नाव आहे. अंकुश याने आपल्याला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून सन 2020 पासून आता पर्यंत वेळोवेळी शरीर संबंध केले असे जळगाव येथील साड्या विक्री करणा-या तरुणीचे म्हणणे आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 87/23 भा.द.वि. 376 सह अ. जा. अ. ज. अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1)(आर)(एस)(ड्ब्ल्यु) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here