धरणाच्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

जळगाव : धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील धानवड शिवारातील पिंपळे धरणात हा बालक पोहण्यास गेला होता. करण जयराम पवार असे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील मयत बालकाचे नाव आहे.

नातेवाईकांनी बालकास मयत अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उप निरीक्षक अनिस शेख यांनी भेट दिली. पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा प्राथमिक तपास हे.कॉ. रतीलाल पवार यांनी केला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here