धरणगाव तालुक्यात खून – पती पत्नीचा वाद सोडवणे बेतले जिवावर

जळगाव : पती पत्नीचा वाद सोडवण्यास जाणा-या एकाची हत्या तर दुसरा जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिसन भोडा नरगावे असे खून झालेल्या चाळीस वर्षाच्या इसमाचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील रामजी ऑईल मिल मधे काम करणारा मजूर नजरीया शुभाराम कुमारीया हा त्याचीपत्नी बानुबाई सोबत वाद घालून शिवीगाळ करत होता. पती पत्नीमधील मोठमोठ्याने होणारी शिवीगाळ बघून गोटू भोडू नरगावे हा त्यांचा वाद मिटवण्यासाठी आला. आमच्या पती पत्नीच्या वादात तु का पडतो असे म्हणत नजरीया कुमारीया याने गोटू नरगावे याला दारुच्या नशेत मारहाण सुरु केली. गोटू नरगावे याला होत असलेली मारहाण बघून बिसन नरगावे हा त्याचा बचाव करण्यासह पती पत्नीमधील वाद सोडवण्यासाठी पुढे आला. मात्र वाद मिटण्याऐवजी बानुबाईचा पती नजरीया याने बिसन नरगावे याला विटेने मारहाण सुरु केली. बिसन याच्या डोक्यावर, तोंडावर आणि छातीवर मारहाण झाल्याने बिसन हा मृत्युमुखी पडला.

या घटनेप्रकरणी गोटू भोडा नरगावे (रा. करचोली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी ह.मु. वराड बुद्रुक – धरणगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नजरीया कुमारीया याच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी दुरक्षेत्राचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here