खंडणी मागणारा मारेक-याचा भाऊ एलसीबीच्या ताब्यात

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यातील मारेक-याच्या जामीनासाठी खंडणी मागणारा मारेक-याचा भाऊ जळगाव एलसीबी पथकाने ताब्यात घेतला आहे. योगेश उर्फ सोनु हिरालाल मोघे (रा. आगवाली चाळ, भुसावळ ह.मु. हिरावाडी पंचवटी नाशिक) असे एलसीबीच्या जाळ्यात अडकेलल्या खंडणी मागणा-याचे नाव आहे.  

भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 94/23 भा.द.वि. कलम 385, 387, 34 नुसार आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 202/23 भा.द.वि. 385, 387, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयीत आरोपींचा शोध सुरु होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या अख्यारीत पथकाची निर्मिती करण्यात आली होती. सहायक फौजदार रवी नरवाडे, हे.कॉ. संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, पोना क्रिष्णा देशमुख, पोकॉ ईश्वर पाटील, पोकों प्रमोद ठाकुर आदींचा या पथकात सहभाग होता.

संशयीत आरोपी योगेश मोघे हा जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात आपली ओळख लपवून रहात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने योगेश मोघे याला शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील कारवाईकामी त्याला भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here