लोखंडी सु-यासह हद्दपार आरोपीस अटक

जळगाव : लोखंडी सुरा बाळगून दहशत माजवणा-या हद्दपार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड (रा. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे.

अटकेतील आरोपीविरुद्ध पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई पोलिस कायदा अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) (3) चे 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक इमरान सैय्यद करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here