मध्यरात्री एकट्या महिलेचा पिता पुत्राकडून विनयभंग

जळगाव : जळगाव शहरातील प्रभात कॉलनी परिसरात एम. जे. कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री एकटी फिरणा-या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटने प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात राहणा-या महिलेचे मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक पोट दुखू लागले. त्यामुळे ती महिला दुखणे कमी करण्यासाठी रस्त्याने एकटीच पायी फिरुन दुखणे कमी करण्याचा प्रयत्न करु लागली. एवढ्या रात्री एकटी महिला पायी फिरत असतांना त्यावेळी त्याच परिसरात राहणारे पिता पुत्र देखील तिच्या जवळ आले. या घटनेतील पिता पुत्रापैकी पित्याने महिलेसमोरच लघुशंका केली. त्याचवेळी पुत्राने महिलेकडे बघून तु काय अप्सरा आहेस काय असे म्हणत तिचा उजवा हात धरुन तिला आपल्याकडे ओढून घेतले. या घटनेमुळे भयभीत महिलेने रामानंद नगर पोलिस स्टेशनला धाव घेत दोघा पिता पुत्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हे.कॉ. सोनवणे पुढील तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here