एश्वर्य नितीन चोपडा यास वाणिज्य शाखेत ९७ टक्के

जळगाव दि.२५ प्रतिनिधी – एम.जे.कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी (क) वाणिज्य शाखेचा विद्यार्थी एश्वर्य नितीन चोपडा हा ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला.

त्याला अकॉउंट्स विषयात १०० पैकी १००, गणित १०० पैकी १००, माहिती तंत्रज्ञान १०० पैकी १०० गुण मिळाले. त्याची आई सौ. रेशमा (हेमलता), वडील नितीन, आजोबा मोहनलाल चोपडा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, बहिण समीक्षा व गरिमा यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here