अनोळखी महिलेचा खून – फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव : अनोळखी महिलेच्या मृत्युप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. खुमसिंग सरदार बारेला (रा. मोर धरणाजवळ हिंगोणा ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे. मयत महिलेचे अंदाजे वय 45 वर्षवयोगटातील आहे.

या घटनेप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. या घटनेतील मयत अनोळखी महिला अटकेतील संशयीत तरुणा सोबत त्याच्या घरी आली होती. त्यावेळी मयत महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तु तुझ्या घरी निघून जा तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल असे त्याने तिला म्हटले होते. दोघात झालेल्या वादाची परिणीती खूनात झाली. तरुणाने त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तिला विहीरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. स.पो.नि. निलेश वाघ पुढील तपास करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here