अल्पवयीन ‘स्पा’ कर्मचारी मुलीवर अत्याचार

नाशिक : पार्टटाइम कामाच्या शोधात “स्पा” सेंटरमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करुन तिचे मोबाइलमध्ये फोटो काढण्यात आले. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरात ही घटना घडली आहे. फोटोच्या माध्ययमातून तिला ब्लॅकमेल करत तिला वेश्याव्यवसायात लोटून उपजीविका चालवणाऱ्या दाम्पत्यावर पोक्सो कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दांपत्याविरुद्ध यापूर्वी देखील असे दोन गुन्हे दाखल आहेत. परेश सुरणा, खुशबू सुराणा अशी या संशयितांची नावे असून सरकारवाडा पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाखाची आहे. महाविद्यालयाच्या भिंतीवर लावलेल्या “स्पा” सेंटरच्या जाहिरातीवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर तिने संपर्क साधला. त्यावेळी पलीकडून एका महिलेने तिला टिळक वाडी येथे बोलावून घेतले. साफसफाईचे काम असल्याचे तिला सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी कामावर गेली असता संशयित महिलेने तिला ज्युस पिण्यास दिले. यांनतर तिला गुंगी आली. शुद्धीवर आल्यानंतर अंगावर चादर असल्याचे तिला दिसले. शेजारी अर्धनग्न अवस्थेत एक इसम असल्याचे देखील तिला दिसले. तिने विचारणा केली असता संशयित महिलेने अनोळखी इसमासोबत मोबाइलमध्ये काढलेला व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेल करण्यात आले.

संशयित सुराणा दांपत्याने पीडित मुलीच्या गरीबीचा गैरफायदा घेत तिला कुंटणखान्याच्या दलदलीत लोटले. पीडित मुलीला पार्टटाईम सफाई करण्याचे कामाचे तीन हजार रुपये महिना मिळणार असल्याने मुलीने त्यास होकार दिला होता. संशयित महिलेने तिला गुंगीचे औषध दिले महिलेच्या पतीने मुलीवर बलात्कार केला. याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत ब्लॅकमेल केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here