जुगार अड्ड्यावर धाड – 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाघोदा बुद्रुक या गावी जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या धाडीत 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दुपारी तिन वाजेच्या सुमारास ही धाड टाकण्यात आली असून यात जवळपास दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वाघोदा बुद्रुक ता. रावेर येथील धनराज पाटील, अनवर पटेल, साबीर पटेल, विनोद कोळी, सुभाष पाटील, अरविंद पाटील, सुभाष चौधरी, शाहरुख पटेल, उमेश कोळी, अनिल पटेल तसेच सावदा येथील काशिनाथ घावा अशा सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. स.पो.नि. जालिंदर पळे यांच्या पथकातील सहायक फौजदार पांडुरंग सपकाळे, हे.कॉ. विजय पोहेकर, संजीव चौधरी, पोलिस नाईक अक्षय हिरोळे, यशवंत टहाकळे, पो.कॉ. दामोदर आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here