आमदारांच्या वाहनाला धडक देणारे डंपर वाळूचे नसून मातीचे – पो.नि. कुंभार

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्याच्या महिला आमदार लता सोनवणे व त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या वाहनाला डंपरने धडक दिल्याची घटना 27 मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास चोपडा ते जळगाव दरम्यान धानोरा खुर्द गावानजीक घडली. धडक देणारे वाहन वाळूचे असल्याची जनतेत चर्चा असली तरी ते वाहन माती वाहतुक करणारे असल्याचे जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे   म्हणणे आहे. प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याचा न विसरता उल्लेख करण्यात आला आहे.  

अपघातग्रस्त इनोव्हा चालक दिपक सुभाष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जळगाव तालुका पोलीस स्टेशनला  गुरनं 145/23 भादवि कलम 337, 279, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here