जळगाव : चोपडा येथील वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी यास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दुखापत या स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नोव्हेंबर 2022 मध्ये सहा महिन्यासाठी जळगांव जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार कालावधीत देखील वैभव गवळी याने चोपडा शहरात राहून खंडणी व गंभीर दुखापतीचा गुन्हा केला आहे.
आगामी काळात होणा-या निवडणुका व विविध जाती धर्माचे सण उत्सव शांततेत पार पडण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. चोपडा उप विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, सहायक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ प्रदीप राजपुत, पोहेकॉ विलेश सोनवणे, पो.कॉ. रविद्र पाटील आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी हे.कॉ. सुनिल दामोदरे यांनी प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य केले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पो.ना. संतोष पारधी, पो.कॉ. विजय बच्छाव यांनी वैभव गवळी यास ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे दाखल (स्थानबध्द) केले आहे.