जळगाव जिल्ह्यात विज पडून एकाचा मृत्यू

जळगाव : आज दुपारी जळगाव शहरसह जिल्ह्यात सुसट्यचा वारा सुटून काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस देखील पडला. पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील  तरुणाचा  अंगावर वीज  पडून मृत्यू झाल्याची  घटना आज  दुपारी घडली.  सुनिल आबाजी भिल असे विज पडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत सुनील भिल हा शरद गोपीचंद पाटील यांच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता. शेतात काम करत असतांना दुपारी पाऊस सुरू झाला. शेतातील लिंबाच्या झाडाखाली तो उभा असतांना त्याच्या अंगावर वीज पडली. अंगावर वीज पडल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. त्याला शेतमालक आणि परिसरातील लोकांनी खासगी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटने प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here