मुलीला भेटायला बोलावून काढले फोटो, केले व्हायरल – तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव : तु मला भेटायला आली नाही तर मी आत्महत्या करुन घेईन अशी धमकी देत बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो काढून प्रसारीत करणा-या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार प्रमोद वाघ असे हुडको पिंप्राळा येथील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

तुषार वाघ याने अल्पवयीन मुलीला तु मला भेटली नाही तर मी आत्महत्या करुन घेईन असे म्हणत फोन करुन बोलावले. त्याने आत्महत्या करुन घेण्याची भिती दाखवल्यामुळे अल्पवयीन मुलगी घाबरुन त्याला भेटण्यास गेली. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईल मधील कॅमे-याने तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो काही दिवसांनी त्याने प्रसारीत केले. त्यामुळे मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला तुषार विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here