आजचे राशी भविष्य (6/6/2023)

आजचे राशी भविष्य (6/6/2023)

मेष : घरातील व्यक्तींसोबत विनाकारण वाद घालू नये. रागावर नियंत्रण ठेवल्यास बरेचसे प्रश्न सुटतील.

वृषभ : इतरांचे सल्ले घेतले तरी निर्णय आपणच घ्यायचा आहे. व्यापारी वर्गाला दगदग होईल.

मिथुन : स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. कठीण प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : मध्यम फलदायी दिवस राहील. प्रतिमा मलीन होणार नाही याची कायम दक्षता घ्यावी लागेल.

सिंह : करारीपणा शाबूत राहील. ठेवा. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून लाभ मिळेल.

कन्या : लाभाच्या संधी मिळतील. प्रतिकुल परिस्थितीत रागावर ताबा ठेवू शकाल.

तुळ : घरातील मोठ्या व्यक्तींचा मान – सन्मान ठेवावा. धनलाभाचे योग जुळतील.

वृश्चिक : चातुर्याच्या बळावर नवनवीन गोष्टी साकारता येतील. काहीतरी नवीन कराल.

धनु : अध्यात्मिक आवड निर्माण होईल. कामात चालढकल करुन चालणार नाही.

मकर : नशिबाची साथ लाभल्याने समस्यांचे निराकरण होईल. नातेसंबध सुधारतील.

कुंभ : जमा व खर्चात योग्य तो समन्वय साधावा लागेल. सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध होईल.

मीन : जोखमीची गुंतवणूक करु नये. आर्थिक स्थिती मजबूत होण्यावर भर द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here