पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगाविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. खुबचंद साहित्या नगर सुप्रिम कॉलनी परिसरातील रहिवासी किरण शंकर खर्चे असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. किरण खर्चे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण सतरा गुन्हे दाखल आहेत.

स्थानबद्ध करण्यात आलेल्या किरण खर्चे याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन (व्हिडीओ पायरेट), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक -५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये धोकादायक व्यक्ती, या संज्ञेत प्रस्ताव तयार करण्यातआला होता. सदर प्रस्ताव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो. निरी. जयपाल हिरे यांनी तयार केला.

स्थानिक गुन्हे शाखेकडे हा प्रस्ताव 14 मे 2023 रोजी सादर करण्यात आला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी 3 जून रोजी याप्रकरणी स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल रघुनाथ वंजारी, पोलिस नाईक सचिन किरण पाटील, योगेश देविदास बारी, नाना तायडे, किरण पाटील तसेच काश्मीरा गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजू तांबे, अविनाश गर्जे, संदीप शिंदे, सचिन सावंत, प्रशांत विसपुते आदींनी गुन्हेगार किरण खर्चे याची मुंबई येथे शोध मोहीम सुरु केली.

या शोध मोहीमेला 6 जून रोजी यश आले. स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश देण्यात आलेल्या किरण खर्चे याला ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला आज 7 जून रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याकामी दाखल करण्यात आले. पोलिस अधिक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील आदींनी परिश्रम घेतले. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील किरण खर्चे याची दहशत नाहीशी झाली असून परिसरातील त्रस्त जनतेने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here