घरफोडीतील आरोपीस अटक

जळगाव : घराचा कडीकोंडा उघडून दोन मोबाईल आणि 29 हजार रुपये रोख चोरी करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विनोद राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील एन सेक्टर मधील पद्मिनी  एंटरप्रायजेस नजीक फौजी ढाब्यासमोर घरातून 9 जून रोजी 2 मोबाईल आणि 29 हजार रुपये चोरी झाले होते. तपासादरम्यान हा गुन्हा एन सेक्टरमधे हमाली काम करणारा विनोद राठोड याने केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून समजली होती.

त्या माहितीच्या आधारे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, सचिन महाजन, इश्वर पाटील यांनी तपासकामी सहभाग घेतला.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here