वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक – तरुण ठार

जळगाव : वाळूने भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज चोपडा तालुक्यातील अडावद येथे घडली. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा वाळूचा विषय चर्चेत आला आहे. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघात झाले असून त्यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. महसुल प्रशासन मात्र यावर गांभिर्याने कारवाई करत  नसल्याची ओरड असून जनतेत संतापाची तिव्र लाट आहे.

राजेंद्र झिंगा धनगर (सोनवणे) असे चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अवघा तिस वर्ष वयाचा तरुण मरण पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर चालक रविंद्र विजय कोळी (सुटकार ता. चोपडा) यास ट्रॅक्टरसह अडावद पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here