विरोधी पक्षनेता अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चीत

ajit pawar

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चीत झाला आहे. त्या दृष्टीने स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. ना. अजित पवार हे 16 जून 2023 रोजी सकाळी साडे सात वाजता अमळनेर येथे आ. अनिल पाटील यांच्या सिद्धीविनायक कॉलनी धुळे रोडवरील निवासस्थानी मोटारीने येतील. त्यानंतर सकाळी आठ वाजता कार्यकर्त्यांसाठी ना. पाटील यांच्या कार्यालयात वेळ देतील. त्यानंतर पावणे नऊ वाजता पत्रकार परिषद राहणार आहे.

सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर अमळनेर येथे आगमन. रा.कॉ. पक्ष ग्रंथालय विभाग राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीरास उपस्थिती. त्यानंतर दुपारी दोन ते तीन राखीव वेळ राहील. सायंकाळी 5.30 वाजता समारोपाचे मार्गदर्शन. सायंकाळी साडे सअहा वाजता अमळनेर येथील विद्यानगर महालक्ष्मी निवास येथे आगमन. याठिकाणि आगमन व राखीव. सायंकाळी साडे सात वाजता आ. अनिल पाटील यांच्या निवासस्थानी सिद्धीविनायक कॉलनी धुळे रोड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार मोटारीने जैन हिल्स जळगाव येथे आगमन व मुक्काम.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here