रा.काँ. महाराष्ट्राच्या सत्तेत दाखल – राज्याचे आता दोन उप – मुख्यमंत्री

On: July 2, 2023 3:25 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताराजकारणात मोठी घडमोड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देत सत्तेत्त दाखल झाला आहे. अजित पवार यांनी चाळीस आमदारांना सोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेची मोट बांधली आहे. या सत्तांतराच्या घडामोडीत राष्ट्रवादी पक्षात जल्लोष साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे देखील आता राज्याचे उप मुख्यमंत्री झाले आहेत.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या राजकीय भूकंपामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment