आजचे राशी भविष्य (3/7/2023)

आजचे राशी भविष्य (3/7/2023)

मेष : नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.

वृषभ : काही दुरावलेली नाती आज नव्याने जवळ येतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.

मिथुन : व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल. काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल.

कर्क : मित्र दिलेले शब्द पाळतील. हाती पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येईल.

सिंह : वैवाहिक जीवनात एकमत राहील तसेच कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. जोडीदारास सरप्राइज गिफ्ट द्याल.

कन्या : महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालू राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा.

तूळ : आज कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील.

वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल.

धनू : उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र द्विधा मन:स्थिती होईल.

मकर : कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. अशा वेळी संयम महत्त्वाचा असेल.

कुंभ : कौटुंबिक सुखात वृद्धी होईल. आज जोडीदाराकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.

मीन : आज काही तब्येतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here