आजचे राशी भविष्य (4/7/2023)

आजचे राशी भविष्य (4/7/2023)

मेष : कौटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. नवोदित कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल.

वृषभ : दैनंदिन कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज आवक पुरेशी राहील.

मिथुन : आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कर्क : पुर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडेल. वैवाहिक संबंधात गोडवा राहील..

सिंह : सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येईल. डोके थंड व वाणीत गोडवा ठेवल्याने कामे सोपी होतील.

कन्या : कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशा पदरी पडेल. काही महत्त्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल.

तूळ : सर्वच दृष्टीने अनुकूल दिवस सत्कारणी लावा. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. हितशत्रू पळ काढतील.

वृश्चिक : नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

धनू : कामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी आल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल.

मकर : आज स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. एकांत हवासा वाटेल.

कुंभ : वैवाहिक जीवनांत खेळीमेळीचे वातावरण राहील. आशादायक दिवस राहील.

मीन : कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढेल. नव्या ओळखी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here