आजचे राशी भविष्य (6/7/2023)

आजचे राशी भविष्य (6/7/2023)

मेष : रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता.

वृषभ : घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नोकरीच्या शोधात असाल तर संधी चालून येतील.

मिथुन : आनंदी व उत्साही दिवस राहील. कुटुंबाला पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

कर्क : दैनंदिन कामातही काही अडथळे येऊ शकतात. मुलांनी अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह : भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. रिकाम्या गप्पा टाळाव्या.    

कन्या : व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

तूळ : आज काही देणी चुकवावी लागतील. हौसमौज करण्यावर थोडी मर्यादा येईल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने हित साधाल.

धनु : नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

मकर : शासकीय कामे रखडतील. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील.

कुंभ : कार्यक्षेत्रात झटपट लाभाचा मोह टाळा. गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूर रहावे.

मीन : कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध जुळून येतील. ध्येयाचा पाठलाग करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here