आजचे राशी भविष्य (7/7/2023)

आजचे राशी भविष्य (7/7/2023)

मेष : महत्त्वाच्या वाटाघाटी, विवाहाविषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृषभ : तब्येतीच्या किरकोळ तक्रारी दुर्लक्षित करु नका. कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

मिथुन : प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता. गृहिणी पॉर्लरसाठी वेळ काढतील.

कर्क : अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह : कुटुंबातील सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल.वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

कन्या : आवडत्या क्षेत्रात नेतृत्व कराल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल.

तूळ : समोरच्या व्यक्तीला मान देऊन काम करावे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

वृश्चिक : अनपेक्षित खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. कलाकारांचा विदेशी नावलौकिक होईल.

धनू : व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या स्तुतीने भारावून जाल.

मकर : वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे दुर्लक्ष होईल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे.

कुंभ : चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील. कळत नाही त्यात वेळ देऊ नये.

मीन : मर्यादा ओळखून वागणे हिताचे राहील. कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here