आजचे राशी भविष्य (8/7/2023)

आजचे राशी भविष्य (8/7/2023)

मेष : पती-पत्नीमधील मतभेद सामंजस्याने मिटतील. व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील.

वृषभ : नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्ग कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालतील.

मिथुन : हौशी मंडळींना खर्चासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल.

कर्क : आवक पुरेशी असेल तरीही बचतीस प्राधान्य द्याल. गृहिणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

सिंह : स्पष्टवक्तेपणाने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता. कमी बोलणे हिताचे राहील.

कन्या : घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचा प्रभाव पडेल. क्षुल्लक कारणाने कटुता येऊ शकते.

तूळ : परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही योग्य माणसे संपर्कात येतील.

वृश्चिक : गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघावी.

धनू : मोठ्या लोकांच्या ओळखी कामी येतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.

मकर : व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता. प्रामाणिक प्रयत्नास यश नक्की.

कुंभ : आज फक्त स्वत:चा विचार करा. जोडीदाराच्या चुका काढू नका.

मीन : हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here