आजचे राशी भविष्य (11/7/2023)

आजचे राशी भविष्य (11/7/2023)

मेष : मनाविरुद्ध घटना घडल्याने मन नाराज होईल. देवधर्माकडे कल वाढेल.

वृषभ : कार्यक्षेत्रात विरोधकांचा जोर वाढलेला आहे. हाताखालच्या लोकांशी जुळवून घ्यावे लागेल.

मिथून : आवक जावक समान राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.

कर्क : महत्त्वाच्या चर्चा, विवाहविषयक बोलणी टाळा. पोटाची दुखणी असतील तर दुर्लक्ष करु नका.

सिंह : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गृहिणी सौंदर्याची काळजी घेतील.

कन्या : ऑफिसला दांडी मारुन विश्रांतीचा मूड होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटेल.

तूळ : चर्चेतून विनाकारण वाद होण्याची शक्यता. नोकरदारांना चांगला दिवस राहील.

वृश्चिक : स्वप्नपूर्तीचा दिवस राहिल. हातात पैसा खेळता असल्याने मनाजोगता खर्च करता येईल.

धनू : पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याची शक्यता. हट्ट पूर्ण झाल्याने गृहलक्ष्मी व मुले समाधानी होतील.

मकर : लांबचा प्रवास घडण्याची शक्यता. काही लांबचे नातलग संपर्कात येतील.

कुंभ : व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज मनापासून खर्च कराल.

मीन : व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालावा लागेल. घरात वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here