नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ प्रकरणी तबलिघींविरोधात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत तबलिघी जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.
याशिवाय चुकीचे वार्तांकन करणाऱ्या मीडियाला देखील फटकारले आहे. फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आला असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. परदेशी नागरिकांविरोधात चुकीची कारवाई करण्यात आली असून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलने आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.